Showing posts with label SARAL. Show all posts
Showing posts with label SARAL. Show all posts

Wednesday, December 21, 2016

Saral Regarding MDM

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *1004*
*दिनांक* : *20/12/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल मध्ये 30 नोव्हेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल नव्याने नोंद करण्याबाबत* __________________________________________

✏  या शैक्षणिक वर्षांपासून शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.हे पोर्टल सुरु झाले तेंव्हा सुरुवातीला सर्व शाळांना त्यामध्ये आपल्या शाळेत असलेला मागील शैक्षणिक वर्षांचा म्हणजेच दिनांक 1 जून 2016 चा शिल्लक धान्य व धान्यादी माल (शिल्लक साठा) नोंद करण्याची सूचना दिली गेली होती.सर्व शाळांनी या मध्ये नोंद देखील केलेली आहे.परंतु त्या वेळी *काही शाळांची opening balance माहिती भरताना चूक देखील झाली असल्याचे निदर्शनास आलेले आहे.*

  ✏तसेच सर्व शाळा दररोज शालेय पोषण आहार लाभार्थी दैनंदिन माहिती म्हणजेच daily attendance भरत आहेत.हे भरत असताना *काही शाळाकडून मागील काही दिवसांची माहिती भरावयाची राहून गेलेली आहे किंवा माहिती भरली परंतु चुकलेली आहे.*

  ✏अशा चुकांमुळे त्या शाळेच्या आपल्या *पोषण आहार नोंद वही मध्ये असलेला सध्याचा शिल्लक साठा आणि MDM पोर्टल ला system कडून तयार ऑटो जनरेट झालेला शिल्लक साठा यामध्ये ताळमेळ बसत नाही म्हणजेच तफावत आढळून येत आहे* असे लक्षात आले आहे.त्यामुळे आपल्याकडे नेमके किती धान्य शिल्लक आहे हे समजणे कठीण होत आहे.

✏यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील महत्वाची सूचना सर्व पोषण आहार लाभार्थी शाळांना देण्यात येत आहे.

✏ *सर्व शाळांनी दिनांक 22/12/2016 ते 31/12/2016 या मुदतीमध्ये आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे.* हे करत असताना आपल्या या वेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काटेकोरपणे मुख्याध्यापकाने नोंद घ्यायची आहे.चुकलेल्या माहितीमुळे भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास संबंधितास जबाबदार धरण्यात येणार आहे.

  ✏सदर माहिती अचूक भरल्यानंतर आपल्या शाळेतील शिल्लक मालाची प्रत्यक्ष स्थिती वरिष्ठ कार्यालयास समजून येणार आहे.यामुळे कोणत्या शाळेला धान्य व धान्यादी मालाची आवश्यकता आहे हे समजून येणार आहे.आजपर्यंत मुख्याध्यापक स्वतः धान्य व धान्यादी मालाची मागणी देत होते ते या प्रक्रियेनंतर संपुष्टात येणार आहे.
  ✏  *तसेच आपल्या शाळेची धान्य मागणी ही system द्वारे जनरेट केली जाऊन पुरवठादारास कळवली जाणार आहे.यामुळे पोषण आहार शाळेस वेळेत पोहचण्यासाठी होणारा विलंब यापुढे होणार नाही हे लक्षात घ्यावे.*

✏  *तसेच पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत रोजच्या रोज घेतली जाणारी नोंदवही मधील नोंद देखील बंद करण्यात येण्याच्या दृष्टीने ही माहिती काळजीपूर्वक भरणे महत्वाचे ठरणार आहे.*

✏ *दिनांक 30 नोव्हेंबर 2016 चा शिल्लक साठा MDM पोर्टल ला कसा भरायचा याबाबत सविस्तर सूचना आपणास उद्याच्या पोस्ट मध्ये देण्यात येतील.*

✏ या सुचनेनंतर सर्व शाळांनी आपल्या शाळेत असलेला इयत्ता 1 ते 5 आणि इयत्ता 6 ते 8 या वर्गांचा दिनांक 30/11/2016 चा शिल्लक साठा वेगवेगळा काढुन ठेवावा.म्हणजे दिलेल्या मुदतीत ही माहिती भरताना विलंब होणार नाही.ही माहिती भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये कोणत्याही स्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशा सूचना या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे.

✏अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

Friday, December 2, 2016

Baseline Summative Problem Solved

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *996*
*दिनांक* : *02/12/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*student पोर्टल update आणि गुजराती, कन्नड मेडिअम शाळांसाठी पायाभूत व संकलित चाचणी संदर्भात सूचना* __________________________________________

✏Student पोर्टल मध्ये पायाभूत आणि संकलित चाचणी चे गुण भरताना स्टेप 2 करताना विद्यार्थी नाव डबल येण्याची जी समस्या येत होती ती समस्या आता दूर करण्यात आलेली आहे.तरी अशी समस्या आलेली होती म्हणून काम थांबवलेल्या शाळांनी त्वरित आपली माहिती भरून पूर्ण करावी.

✏आधार माहिती भरताना रिपोर्ट मध्ये ज्या समस्या आलेल्या होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहे.आधार माहिती भरण्यासंदर्भात काही समस्या असेल तर कृपया idreambest@gmail.com या email वर मेल करा अथवा खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून student पोर्टल ला येत असणाऱ्या समस्या कळवा

*लिंक* : http://goo.gl/9vBAQ8

✏Student पोर्टल मध्ये *गुजराती आणी कन्नड मेडिअम* च्या पायाभूत आणि संकलित चाचणीचे गुण भरताना काही तांत्रिक अडचण येत आहे.तरी अशा मेडिअम असणाऱ्या शाळांना सूचित करण्यात येत आहे की,सदर समस्या आज सोडवण्यात येईल.तरी पुढील सूचना येईपर्यंत कृपया गोंधळून न जाता वाट पहावी.

अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :   https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Thursday, December 1, 2016

MDM LOGIN

*@ MDM केंद्रप्रमुख लॉगिन वरून कसे भराल?@*
   *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2016पर्यंत आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे.*

*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password -    केंद्रप्रमुखांचा* 

       🙏 *शिवाजी नवाळे सर* 🙏

*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*

   https://education.maharashtra.gov.in/mdm

*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
   *MDM Daily INFO वर क्लिक करा.*

  *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख MDM Attendance Date मधून निवडा*.

*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*

*Management Type मध्ये तुमच्या शाळेला जे लागू होते ते निवडा.*

*Management Details योग्य निवडा. आणि त्यासमोरील Result बटनावर क्लिक करा.*

  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.*

*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*

   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*

*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
      
    
           
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
                  
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*🙏😂🙏

Wednesday, November 30, 2016

Saral update 30th Nov 2016

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *994*
*दिनांक* : *30/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*School पोर्टल लॉगिन तात्पुरते बंद केले असल्याबाबत* __________________________________________

  महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांना स्कूल पोर्टल लॉगिन उपलब्ध करून दिले होते,परंतु याच वेळी स्कूल पोर्टल मधील संच मान्यताची माहिती भरण्याचे काम देखील चालू आहे.यामुळे सर्वर वर काल प्रचंड लोड आल्याने स्कूल पोर्टल आणि संच मान्यता  खूप स्लो झाल्याचे निदर्शनाला आले.त्यामुळे स्कूल पोर्टल मध्ये शाळा माहिती भरण्यासाठीचे लॉगिन काही काळासाठी बंद करण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.    संचमाण्यताच्या कामाचा लोड कमी झाला की पुढील 2 दिवसात पुन्हा स्कूल पोर्टल माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.      सध्या संच मान्यता मधील माहिती भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे,ज्यांनी अद्याप माहिती भरलेली नाही अशा शाळांनी त्वरित आपली माहिती भरून पूर्ण करावयाची आहे.तसेच *स्कूल पोर्टल मध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही लॉगिन करू नये हे लक्षात घ्यावे.*

अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

Online Gen. Register no changing

*ऑनलाइन विद्यार्थी जनरल रजिस्टर नंबर बदल बाबत*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

*ऑनलाइन विद्यार्थी माहिती ट्रासफर करताना किंवा मागिल वर्षी माहिती भरताना चुकीने त्याचा प्रवेश निर्गम क्रमांक बदलला असेल तर तो शालेय रेकार्ड नुसार दुरुस्त करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करा.*

👉🏼Maintenance टैब मध्ये update standard data वर क्लिक करा .

👉🏼पुढील पाथ
*Type - Standard Change Select - Reason - Entered by Mistake*
*Search by - Standard Academy Year , Standard , Division निवडून Submit करा*

👉🏼विद्यार्थी select करा .
       Update Data करा .

👉🏼तिथे *General Register Number Change*करा .

🛡 *लक्षात घ्या येथे पहिल्यांदा विध्यार्थीचा वर्ग चेंज करावा लागतो*.

👉🏼तो विद्यार्थी मागच्या किंवा पुढच्या वर्गात दाखल होता .

👉🏼पुन्हा same process करून विद्यार्थी आहे त्या वर्गात आणा .

👉🏼 येथे इयत्ता पण चेंज करावी लागते पण आहे त्या इयत्तेमध्ये आपण त्याला आणू शकतो .

*या प्रकारे General Register Number Change होतो*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Saral update 30 Nov 2016

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *994*
*दिनांक* : *30/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबत* __________________________________________

*महत्वाचे* : पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबतचे Manual download करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.

*लिंक* : https://goo.gl/5mwz6y

*खालील माहिती वाचून आपण पायाभूत आणि संकलित चाचणी चे गुण पोर्टलमध्ये भरू शकता.*

  सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपले login करून excel या tab ला क्लिक करावे.या  स्क्रीन मध्ये excel या tab मधील *download baseline and summetive exam 1* या बटनावर क्लिक करावे.

  यामध्ये आपण आपणास ज्या वर्गाची file download करावयाची आहे तो वर्ग आणि तुकडी भरावी आणि download या tab ला क्लिक करावे.लगेचच आपल्या कॉम्पुटर मध्ये त्या वर्गाची एक excel file download झालेली दिसेल.

  या file ला ओपन करून आपण दिलेल्या नमुन्यात पायाभूत आणि संकलीत चाचणी चे गुण भरावयाचे आहे.ही excel file open करताना एक सुचना संगणकावर दिसून येईल त्या सूचनेस आपण *yes* असे करावे.

  सदर स्क्रीन मध्ये आपणास वरील बाजूस असलेल्या *enable editing* या बटनाला क्लिक केल्याशिवाय सदर स्क्रीन मध्ये कोणतेही काम करून दिले जात नाही याची नोंद घ्यावी.काही काही Ms-office मध्ये enable editing ची सूचना येत नाही अशा शाळांनी डायरेक्ट गन भरायला सुरुवात करावी.

या sheet मध्ये ज्या ठिकाणी *आकाशी रंग* दर्शविला गेलेला आहे फक्त त्या कॉलम मध्ये  माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.इतर ठिकाणी आपण काहीही माहिती भरू शकणार नाही.तशी सुविधा sheet मध्ये करून देण्यात आलेली आहे.

सदर स्क्रीन चे निरीक्षण व्यवस्थित केल्यास आपणास असे लक्षात येईल की आपण *ज्या वर्गाची file download करू त्या वर्गासाठी पायाभूत चाचणी आणि संकलीत मूल्यमापन यासाठी असलेल्या गुणानुसार सदर sheet download होते.*

*उदा.,*  इयत्ता पहिली च्या वर्गासाठी पायाभूत चाचणी नसल्याने सदर sheet मध्ये फक्त संकलीत मूल्यमापन १ चीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांना देखील आपणास लागू असणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे गुण लक्षात घेऊन त्याप्रमाणे भरण्याची सुविधा असलेली file download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे आपण माहिती त्वरीत भरून पूर्ण करावयाची आहे.

  अशा प्रकारे आकाशी रंगात असलेल्या कॉलम मध्ये प्रथम पायाभूत चाचणी आणि नंतर संकलीत मूल्यमापन-१ च्या गुणांची नोंद करावी.यामध्ये दोन्ही परीक्षेच्या बाबतीत present yes/no आणि marks obtaine अशा दोन कॉलम मध्ये माहिती भरावयाची आहे.ही माहिती भरताना खालील काही सूचना वाचा.

✏१) *विद्यार्थी जर परीक्षेसाठी उपस्थित असेल तर त्याच्या नावासमोर present Y/N या कॉलम मध्ये फक्त कॅपिटल मध्ये Y असे लिहावे.जर विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर कॅपिटल मध्ये N असे लिहावे.*

✏२) *जर विद्यार्थी  गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर marks obtaine या कॉलम मध्ये गुणांची नोंद काहीच घेऊ नये म्हणजेच blank सोडावे.कृपया तेथे 0 देखील लिहू नये याची नोंद घ्यावी.*

✏३) *काही मुले परीक्षेसाठी हजर असतील परंतु त्याना जर गुण 0 मिळाले असतील तर तेथे 0 असेच लिहावे.तेथे blank सोडू नये हे लक्षात घ्यावे.*

✏४) *ज्या मुलांची नोंद आपण student पोर्टल मध्ये केलेली नाही अशा मुलांचे नाव गुण भरण्यासाठी सदर excel sheet मध्ये दिसून येणार नाही.यासाठी सर्व विद्यार्थी student पोर्टल मध्ये नोंद करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.*

✏५) *जे student आपण out of school केलेले आहे किंवा not known तुकडी मध्ये टाकलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव देखील excel sheet मध्ये दिसून येईल.*

✏६) *मिळालेले गुण हे एक अंकी असेल तर अशा गुणाची नोंद ही एक अंकीच करावी.म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याला ९ गुण मिळालेले असेल तर अशा गुणांची नोंद ही 09 अशी न करता फक्त 9 अशीच करावी.*

✏७) *अंध-अपंग आणि यासारखे काही विद्यार्थी जर शाळेत हजर असूनही जर परीक्षेला बसू शकले नाही किंवा परीक्षा देऊ शकले नाही तर अशा मुलांना Present Y/N कॉलम मध्ये Y असे लिहावे आणि गुणांच्या कॉलम मध्ये काहीही लिहू नये म्हणजेच ब्लॅंक सोडावे.*

✏८) *माहिती भरून पूर्ण केल्यावर आणि सदर माहिती upload केल्यानंतर असे लक्षात आले की माहिती भरताना चूक झालेली आहे अशा वेळी सदर sheet पुन्हा भरून पुन्हा नव्याने upload करू शकाल.अशा वेळी अगोदर भरलेली माहिती निघून जाऊन नव्याने भरलेली माहिती त्या ऐवजी save होईल याची नोंद होईल.*

   यानंतर सदर sheet ही save as करून घ्यावी.save as करताना ही शीट *other format मधील  .csv (comaa delimited) या format मध्ये save करावी.*

सदर file save करताना file name मध्ये त्या file चे नाव बदलवू नये.अन्यथा सदर file ही system ला upload होणार नाही.

   आता आपण विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ही सदर file मध्ये केलेली आहे.ही file आपण आपल्या login मध्ये दिलेल्या सुविधेचा उपयोग करून upload करणार आहोत.यासाठी मुख्याध्यापक आपले student पोर्टल मध्ये login करतील.login केल्यावर excel tab मधील upload baseline and summative १ या बटनावर क्लिक करतील.

excel tab मधील *upload baseline and summative १* या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक स्क्रीन पहावयास मिळेल.

   या स्क्रीन मधील browse या बटनावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांची गुणांची नोंद केलेली .csv (comaa delimited) या format मधील file जी आताच आपण save केलेली आहेत ती file select करावी आणि open या बटनावर क्लिक करावे.

  अशा प्रकारे आपण सदर file browse या बटणाचा वापर करून select करावी.यानंतर browse या बटणाच्या समोर सदर file चे नाव दिसून येईल.

  यानंतर आपण upload step – १ या बटनावर क्लिक करावे.या बटनावर क्लिक केल्यावर जर आपण excel sheet मध्ये न भरलेली माहिती ही योग्य प्रकारे भरलेली असेल तर आपणास पुढील प्रकारची नोटीफिकेशन म्हणजेच *upload-step १ completed, please click on upload step २* अशा अर्थाची नोटीफिकेशन स्क्रीन वर आपणास दिसून येईल.या नोटीकेशन ला ok केल्यावर आपणास खाली आपण नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि गुणांची माहिती दिसून येईल.तसेच आपण माहिती भरताना काही चुक झालेली असेल तर याच स्क्रीन वर तसा error देखील दाखवण्यात येतो.

  वरील स्क्रीन वर असलेल्या *upload २* या बटनावर क्लिक करावे. या बटनावर क्लिक केल्यावर आपणास *data uploaded successfully* अशा नोटीफिकेशनची स्क्रीन दिसून येईल.

  अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत आणि संकलीत परीक्षांच्या गुणांची नोंद सरल student पोर्टल मध्ये नोंद्वावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.सदर माहिती नोंद केल्यावर आपण ही माहिती व्यवस्थितपणे नोंदवली गेली अथवा नाही हे पहाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर माहिती तपासून पाहण्यासाठी आपण *report या tab मधील Baseline & summative १ या बटनावर* क्लिक करावे.

या बटनावर क्लिक केल्यावर एक स्क्रीन आपणास पहावयास मिळेल.

  या स्क्रीन मध्ये आपणास कोणत्या परीक्षेचा report बघावयाचा आहे त्यानुसार report पहाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याप्रमाणे आपण आपल्या शाळेचा वर्ग/तुकडी निहाय report तपासून पाहू शकाल.

*महत्वाचे* : पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणी चे गुण सरल student पोर्टल मध्ये कशा प्रकारे नोंद्वावयाचे याबाबत मराठीत manual आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.कृपया सदर ब्लॉग ला भे द्या.

   अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Sunday, November 27, 2016

Attendance app in saral portal

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *988*
*दिनांक* : *27/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

_________________________________________
       🔸  *विद्यार्थ्याची online हजेरी अँप बाबत* 🔸
_________________________________________

मित्रांनो, *विद्यार्थ्याची online हजेरी भरणे साठी एक अँड्रॉइड अँप उपलब्ध झाले आहे किंवा विद्यार्थ्याची हजेरी ही student पोर्टल ला भरावयाची सुविधा देण्यात आलेली आहे अशा अर्थाची एक पोस्ट whatsapp वर share होताना दिसून येत आहे.*  तसेच या संबंधी एक ppt देखील whatsapp वर share केली जात आहे.यामुळे सर्व शिक्षक बांधव student पोर्टल ला लॉगिन करून या सुविधेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न  करत आहे.तरी *आपणास या पोस्ट द्वारे सूचित करण्यात येत आहे की,सध्या "online हजेरी" किंवा "हजेरी साठी अँड्रॉइड अँप" अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,* याची नोंद घ्यावी.सध्या *हजेरी बाबतचे हे अँड्रॉइड अँप टेस्टिंग मोड मध्ये असून जेंव्हा अशी कोणतीही सुविधा सरल मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल तेंव्हा याबाबत अधिकृतरित्या आपणास कळविण्यात येईल.* तरी कृपया कोणीही ही सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी अथवा अधिक जाणून घेण्यासाठी student पोर्टल ला लॉगिन करू नये.

✏सध्या *baseline,संकलित चाचणी 1 चे गुण भरणे आणि आधार माहिती* भरण्याचे काम प्राधान्याने सुरु असल्याने सर्वर वर लोड आहे तसेच *पायाभूत चाचणी व संकलित चाचणी 1* चे गुण भरण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच *28 नोव्हेंबर 2016* असल्याने सर्व शाळा हे काम करत आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थी online हजेरी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आपण लॉगिन केले तर सर्वर वर अधिकचा ताण येऊ शकतो आणि ज्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे अशा बांधवांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.
  
    ✏  *व्हाट्सअप्प ग्रुप वर सध्या share होत असलेली online हजेरी बाबतची ही ppt यापुढे कोणीही share करू नये.* यामुळे अधिक गोंधळ निर्माण होत आहे.तसेच अधिकृत मेसेज अथवा whatsapp पोस्ट मिळाल्याशिवाय इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्या अगोदर खात्री करून घ्यावी. अशा प्रकारच्या सुविधा जेंव्हा उपलब्ध करून दिल्या जातात तेंव्हा student पोर्टल ला नोटीफिकेशन दिले जाते.याशिवाय राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्या सरल च्या राज्यस्तरीय ग्रुप वर प्रथम कळवले जाते.तसेच आमच्या सरल राज्यस्तरीय ग्रुप वरही अशा सुविधांबाबत माहिती दिली जाते.त्याचप्रमाणे havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग ला देखील अशी update माहिती उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे अशा पोस्ट वर अधिक लक्ष न देता विद्यार्थी आधार नंबर आणि पायाभूत,संकलित चाचणी चे गुण भरण्याचे काम पूर्ण करून घेणे.

✏सरल संदर्भात काही अडचण असेल तर कृपया आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.येथे आपणास सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

✏ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे

Friday, November 25, 2016

SARAL UPDATE 25-11-16

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *984*
*दिनांक* : *25/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

___________________________________________
🔸 *school पोर्टल मध्ये माहिती भरण्याची   सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत*🔸
____________________________________________

      ✏ सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, *सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांची शाळा पोर्टल (school portal) ची  माहिती online पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे* याची नोंद घ्यावी.

      ✏या वर्षीची स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची सुविधा मागील महिन्यात  देण्यात आलेली होती,परंतू *संच मान्यताबाबत काम प्राधान्याने करावयाचे असल्याने school पोर्टल मध्ये माहिती भरण्याचे काम काही काळासाठी थांबवण्यात आलेले होते याची नोंद घ्यावी.*

    ✏ मागील महिन्यात जेंव्हा आपणास स्कूल पोर्टल ची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती तेंव्हा जर आपण school पोर्टल ची माहिती भरलेली असेल तर ती भरलेली माहिती पुन्हा भरण्याची आवश्यक्ता नाही याची नोंद घ्यावी.

   ✏तसेच *बेसिक टॅब  मधील शाळेची माहिती भरताना काही स्क्रीन (उदा., school category, management,medium इत्यादी) या भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही आहे म्हणजेच काही स्क्रीन या  ऑलरेडी finalized असलेल्या दिसून येतील* याची नोंद घ्यावी.जर शाळेची ही *बेसिक माहिती चुकलेली असेल आणि आपणास ही माहिती दूरस्थ करावयाची असेल तर दुरुस्थ करण्याची  ही सुविधा शिक्षणाधिकारी लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,* यासाठी अशा शाळांनी आपल्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

   ✏ सदर काम हे तातडीने पूर्ण कारावयाचे आहे याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉगला भेट द्या.

✏ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे

Wikipedia

Search results