Wednesday, November 30, 2016

Saral update 30th Nov 2016

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *994*
*दिनांक* : *30/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*School पोर्टल लॉगिन तात्पुरते बंद केले असल्याबाबत* __________________________________________

  महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांना स्कूल पोर्टल लॉगिन उपलब्ध करून दिले होते,परंतु याच वेळी स्कूल पोर्टल मधील संच मान्यताची माहिती भरण्याचे काम देखील चालू आहे.यामुळे सर्वर वर काल प्रचंड लोड आल्याने स्कूल पोर्टल आणि संच मान्यता  खूप स्लो झाल्याचे निदर्शनाला आले.त्यामुळे स्कूल पोर्टल मध्ये शाळा माहिती भरण्यासाठीचे लॉगिन काही काळासाठी बंद करण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.    संचमाण्यताच्या कामाचा लोड कमी झाला की पुढील 2 दिवसात पुन्हा स्कूल पोर्टल माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.      सध्या संच मान्यता मधील माहिती भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे,ज्यांनी अद्याप माहिती भरलेली नाही अशा शाळांनी त्वरित आपली माहिती भरून पूर्ण करावयाची आहे.तसेच *स्कूल पोर्टल मध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत कोणीही लॉगिन करू नये हे लक्षात घ्यावे.*

अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results