Sunday, November 27, 2016

Attendance app in saral portal

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *988*
*दिनांक* : *27/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

_________________________________________
       🔸  *विद्यार्थ्याची online हजेरी अँप बाबत* 🔸
_________________________________________

मित्रांनो, *विद्यार्थ्याची online हजेरी भरणे साठी एक अँड्रॉइड अँप उपलब्ध झाले आहे किंवा विद्यार्थ्याची हजेरी ही student पोर्टल ला भरावयाची सुविधा देण्यात आलेली आहे अशा अर्थाची एक पोस्ट whatsapp वर share होताना दिसून येत आहे.*  तसेच या संबंधी एक ppt देखील whatsapp वर share केली जात आहे.यामुळे सर्व शिक्षक बांधव student पोर्टल ला लॉगिन करून या सुविधेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न  करत आहे.तरी *आपणास या पोस्ट द्वारे सूचित करण्यात येत आहे की,सध्या "online हजेरी" किंवा "हजेरी साठी अँड्रॉइड अँप" अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,* याची नोंद घ्यावी.सध्या *हजेरी बाबतचे हे अँड्रॉइड अँप टेस्टिंग मोड मध्ये असून जेंव्हा अशी कोणतीही सुविधा सरल मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल तेंव्हा याबाबत अधिकृतरित्या आपणास कळविण्यात येईल.* तरी कृपया कोणीही ही सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी अथवा अधिक जाणून घेण्यासाठी student पोर्टल ला लॉगिन करू नये.

✏सध्या *baseline,संकलित चाचणी 1 चे गुण भरणे आणि आधार माहिती* भरण्याचे काम प्राधान्याने सुरु असल्याने सर्वर वर लोड आहे तसेच *पायाभूत चाचणी व संकलित चाचणी 1* चे गुण भरण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच *28 नोव्हेंबर 2016* असल्याने सर्व शाळा हे काम करत आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थी online हजेरी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आपण लॉगिन केले तर सर्वर वर अधिकचा ताण येऊ शकतो आणि ज्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे अशा बांधवांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.
  
    ✏  *व्हाट्सअप्प ग्रुप वर सध्या share होत असलेली online हजेरी बाबतची ही ppt यापुढे कोणीही share करू नये.* यामुळे अधिक गोंधळ निर्माण होत आहे.तसेच अधिकृत मेसेज अथवा whatsapp पोस्ट मिळाल्याशिवाय इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्या अगोदर खात्री करून घ्यावी. अशा प्रकारच्या सुविधा जेंव्हा उपलब्ध करून दिल्या जातात तेंव्हा student पोर्टल ला नोटीफिकेशन दिले जाते.याशिवाय राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्या सरल च्या राज्यस्तरीय ग्रुप वर प्रथम कळवले जाते.तसेच आमच्या सरल राज्यस्तरीय ग्रुप वरही अशा सुविधांबाबत माहिती दिली जाते.त्याचप्रमाणे havelieducation.blogspot.in 
या ब्लॉग ला देखील अशी update माहिती उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे अशा पोस्ट वर अधिक लक्ष न देता विद्यार्थी आधार नंबर आणि पायाभूत,संकलित चाचणी चे गुण भरण्याचे काम पूर्ण करून घेणे.

✏सरल संदर्भात काही अडचण असेल तर कृपया आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.येथे आपणास सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

✏ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results