पुढील आठवड्यामध्ये केंद्र शासन pre Matric Scholarship for Minority या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे त्यामुळे राज्याची सदर माहिती मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांची अडचण सोडविण्यासाठी मदत होईल...
✳️ Pre - Matric Scholarship for Minority ✳️
🟢 NSP 2.0 Portal (www.scholarships.gov.in)🟢
🛑 Renewal Verification:
नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्यासाठी पोर्टल वरती शाळेने नोडल ऑफिसर मधून लॉगिन करावे verification-> renewal application verification मधून अर्ज व्हेरिफाय करावे.
अर्ज व्हेरिफाय करण्यापूर्वी पुढील प्रमाणे माहिती पहावी.
❇️ प्रथम रिपोर्ट मधून नूतनीकरण विद्यार्थ्यांची यादी काढावी व यादी नुसार सर्व अर्ज भरले का याची खात्री करावी.
❇️ विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे का? हे तपासावे.
❇️ अर्जामध्ये भरलेली माहिती कागदपत्रांनुसार बरोबर आहे का?
❇️ आधार नंबर व आधार नुसार नाव आहे का?
❇️ नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकारी यांच्या सहीचे घेण्याची आवश्यकता नाही मात्र विद्यार्थ्यांनी ज्या वेळी नवीन मध्ये अर्ज केला होता त्यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे घेतलेले असावे व सदर प्रमाणपत्र शाळेच्या रेकॉर्ड मध्ये असावे.
❇️ अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची असल्यास अर्ज Defect करावा व विहित मुदतीत मध्ये विद्यार्थ्याच्या लॉगिन मधून दुरुस्ती करून अर्ज final submit करावा व शाळेच्या नोडल ऑफिसर यांच्या लॉगिन मधून renewal reverification मधून विहित मुदतीत मध्ये अर्जाची पडताळणी पूर्ण करावी.
❇️ अर्जामधील विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत नसल्यास अर्ज Reject करण्यात यावा.
❇️ बनावट अर्ज आढळल्यास अर्ज mark as fake करावा.
❇️ विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती नको असल्यास किंवा इतर शिष्यवृत्ती लाभ घ्यावयाचा असल्यास अर्ज final submit करण्यापूर्वी withdraw करावा.
❇️ अर्ज मधील विद्यार्थ्यांचे बँकेचा तपशील चुकीचा असल्यास अशा विद्यार्थ्यांची यादी बनवावी व ज्यावेळी शिष्यवृत्तीची रक्कम वाटप केली जाते त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांचे बँकेचे तपशील चुकीचे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अर्जामधील रजिस्टर मोबाईल वरती बँकेचा तपशील दुरुस्त करण्याबाबत sms पाठवला जातो. व बँकेचा तपशील दुरुस्त करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येतो सदर मुदतीमध्ये विद्यार्थ्यांचे बँकेचे तपशील दुरुस्त करून घ्यावे.
🟢 शिष्यवृत्तीचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची राहील. शाळे मधील सर्व पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे.
🟢 प्रत्येक शाळेने नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज व संबंधित सर्व कागदपत्रे किमान ५ वर्षे शाळेमध्ये जतन करून ठेवावे.
🟢 नवीन वनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी पोर्टल वरती भरण्यात यावे.
🟢 नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज सर्व शाळांनी 15 डिसेंबर पूर्वी पडताळणी पूर्ण करून घ्यावी .एकही अर्ज पडताळणी साठी शाळा स्तरावर प्रलंबित राहणार याची दक्षता घ्यावी.अर्ज शाळा स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित राहिला व संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS