*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *18/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
*"विद्यार्थी ट्रान्सफर request approve होत नसेल किंवा ट्रान्सफर होऊन आलेला विद्यार्थी update होय नसेल" अशा समस्या असणाऱ्या शाळांसाठी सूचना*
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या नवीन शाळेने जुन्या शाळेस student पोर्टल मधून विद्यार्थी ट्रान्सफर साठी केलेली request जुन्या शाळेने approve केली नाही तर अशा शाळेस पुढील इतर कोणतेही काम थांबवण्यात आलेले होते.जोपर्यंत जुनी शाळा त्या विद्यार्थ्याच्या बाबतीतील request approve अथवा रिजेक्ट करत नाही तोपर्यंत त्या शाळेला कोणतेही काम करता येत नव्हते.सदर शाळेने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीतील request ही approve किंवा रिजेक्ट केली की त्या शाळेला आपले इतर कामासाठी student पोर्टल उपलब्ध करून दिले जात होते.सदर सुविधा उपलब्ध करून देण्यापूर्वी बऱ्याच शाळा काम करत नसत अथवा चुकीच्या पद्धतीने काम करताना दिसून येत असत.
*समजून घेण्यासाठी पुढील उदाहरण वाचावे* :
अशा केस मध्ये समजा A शाळेला B शाळेकडून विद्यार्थी ट्रान्सफर ची request आलेली होती,परंतु परंतु A शाळेने सदर request approve न करता त्या विद्यार्थ्यास out of school केले.खरंतर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत शिकायला गेलेल्या मुलाला आऊट ऑफ स्कूल न करता नवीन शाळेतून request येईपर्यंत not known तुकडीत ट्रान्सफर करून ठेवावे अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आलेल्या असतानाही काही शाळांनी विद्यार्थ्याना out of school केले आहे.अशा केस मध्ये शाळांनी त्या विद्यार्थ्यास आऊट ऑफ स्कूल केले परंतु त्याच विद्यार्थाची ट्रान्सफर request approve केली नाही.त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या माहितीमधून निघून गेला परंतु student transfer request आहे तशीच राहिली. याच दरम्यान सिस्टिम कडून request approve न करणाऱ्या शाळांना त्वरित काम करावे म्हणून सिस्टिम ने अडवले.परंतु *अशा केस मध्ये आता आधीच आऊट ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी हे ट्रान्सफर करणे शक्य होत नसल्याची तांत्रिक समस्या शाळेसमोर येत आहे.*
ही समस्या काही निवडक शाळांनाच येत आहे.तसेच ही समस्या सोडवण्यासाठी अशा समस्या असणाऱ्या शाळांसाठी आम्ही मदत म्हणून आपणास आमच्या ब्लॉग ला एक फॉर्म देखील उपलब्ध करून दिला होता.त्या फॉर्म द्वारे बऱ्याच शाळांनी आपली माहिती कळवलेली आहे.त्यानुसार रोज अशा शाळांची समस्या सोडवण्यात येत आहे.ज्या शाळांनी अशा फॉर्म द्वारे आपली माहिती भरलेली आहे अशा शाळांना या पोस्ट द्वारे सूचित करण्यात येत आहे की,आपली समस्या देखील सोडवण्यात येईल,कृपया वाट पहावी.शाळांची संख्या अधिक असल्याने आपल्या request चा नंबर लागला की त्वरित आपली समस्या सुटेल तरी अद्याप समस्या न सुटणाऱ्या शाळांना विनंती आहे की पुन्हा पुन्हा फॉर्म भरू नये,अशाने समस्या सोडवण्यासाठी आम्हाला त्रास होत आहे.अद्याप ज्या शाळांना अशी समस्यां आहे परंतु त्यांनी अद्याप कळवले नाही अशा शाळांनी खालील लिंक ला क्लीक करा किंवा आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या,तेथे आपणास सदर फॉर्म online भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.whatsapp द्वारे मेसेज करून सदर समस्या पाठवल्यास आपली समस्या सुटण्यास अधिक वेळ लागू शकतो याची नोंद घ्यावी त्यासाठी ब्लॉग ला भेट द्या अथवा खालील लिंक ला क्लीक करा.
विद्यार्थी ट्रान्सफर request approve होत नसेल किंवा ट्रान्सफर होऊन आलेला विद्यार्थी update होय नसेल तर सदर समस्या कळविण्यासाठीची
*लिंक* : goo.gl/tLuhLA
*(महत्वाची टीप: सदर लिंक ला माहिती भरली म्हणजे आपली समस्यां सुटली किंवा आपण शासनाला आपली समस्या कळवलेली आहे आणि आता ही जबाबदारी शासनाची आहे असा कृपया अर्थ घेऊ नये.सदर समस्यां सोडवण्यासाठी मी प्रदीप भोसले केवळ आणि केवळ आपणास सरल कामात मदत व्हावी म्हणून वैयक्तिक प्रयत्न करत आहे ही स्पष्ट कल्पना या पोस्ट द्वारे आपणास देत आहे याची नोंद घ्यावी.)*
✏ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक* :
https://goo.gl/6CiLy0
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS