Monday, August 21, 2017

Saral New Update

सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०८८
दिनांक : २१/०८/२०१७
(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे
__________________________________________
➡ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना __________________________________________

✏ सर्वांना सूचित कारण्यात येत आहे की, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया,हिंगोली,परभणी,जालना,औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, कोल्हापूर,सांगली या जिल्ह्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.

✏ तसेच आज सायं 9 वाजेपर्यंत अकोला, वाशीम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, नासिक, ठाणे,रायगड,पुणे,अहमदनगर,बीड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

✏ तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे संवर्ग-३ साठी फॉर्म भरण्यास उपलब्ध करून देण्यात आलेला नसून सदर फॉर्म आज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

✏ काही शिक्षकांनी संवर्ग-१ चा फॉर्म भरलेला होता,परंतु सदर फॉर्म हा draft मोड मध्ये म्हणजेच फक्त  save होता.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे असे फॉर्म सिस्टिम द्वारे वेरीफाय होत होते.तरी draft मोड मध्ये save असलेला आपला फॉर्म  शिक्षकांनी दिनांक २१/०७/२०१७ नंतर वेरीफाय केलेला असेल तर अशा शिक्षकांचा फॉर्म बदली साठी ग्राह्य धरला जाणार नाही.सदर फॉर्म हे प्रक्रिया करताना रिजेक्ट केले जात आहे.या आधीच दिनांक २१/०७/२०१७ रोजी संवर्ग-१ चे लॉगिन बंद करण्यात आल्याचे कळविले गेलेले आहे.या संदर्भात पोस्ट क्रमांक १०६८ वाचावी.

✏ दिनांक १९/०८/२०१७ पासून संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा दुपारी ४:०० वाजता बंद करण्यात आलेली आहे.तसेच संवर्ग-२ मध्ये फॉर्म draft मोड मध्ये म्हणजेच फक्त save असलेले फॉर्म वेरीफाय करण्याची सुविधा दिनांक २०/०८/२०१७ रोजी दुपारी २:०० वाजता बंद करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.याबाबत पोस्ट क्रमांक १०८८ वाचावी.

✏ अवघड क्षेत्रात ३ वर्षांपेक्षा अधिक काळ सलग सेवा झालेल्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनाच दर्जा प्राप्त होतो.असे शिक्षक संवर्ग-३ चा फॉर्म भरू शकतात. तसेच सदर शिक्षक हे सोपे क्षेत्र व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांची जागा आपल्या पसंतीक्रमात नमूद नमूद करू शकतात.अशा शिक्षकांना फॉर्म भरताना ज्या शाळा संवर्ग–१ व २ ने घेतलेल्या आहेत त्या शाळा दिसून येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच संवर्ग-३ ला फॉर्म भरताना ज्या शाळा उपलब्ध असतील त्याच शाळा दाखवण्यात येणार आहे.

✏ बऱ्याच शिक्षकांची अशी धारणा आहे की,आपली १० वर्षे सलग सेवा सोपे किंवा अवघड क्षेत्रात झाल्याने आपण बदली पात्र शिक्षक असल्याने आपली संवर्ग-४ मध्ये बदली होणारच आहे.तर ही धारणा चुकीची असून संवर्ग-१,संवर्ग-२ आणि संवर्ग-३ मधील शिक्षकांनी ज्या शिक्षकांची जागा घेतलेली आहे म्हणजेच ज्या शिक्षकांना खो मिळणार आहे फक्त असेच शिक्षक हे संवर्ग-४ मध्ये बदलीसाठी घेतले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

✏ बदली पात्र शिक्षक : ज्या शिक्षकांची १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सलग सेवा ही सोपे किंवा अवघड क्षेत्रात झालेली आहे असे शिक्षक बदली पात्र शिक्षक म्हणून समजले जातात.

✏ संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरलेल्या शिक्षकांची बदली लिस्ट लागल्यानंतर लगेचच भरलेल्या माहितीची योग्य कागदोपत्री पुरावा अथवा प्रत्यक्ष माहितीची वरिष्ठ कार्यालयाकडून पडताळणी होणार आहे. चुकीची माहिती भरून वा दिशाभूल करून फॉर्म भरलेल्या अर्जदारावर कठोर कारवाई करणार असल्याचे या आधीच ग्राम विकास मंत्रालयाकडून कळविले गेलेले आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे चुकीची माहिती भरून आपण बदली होईल या मोहाला बळी पडू नये.कारण बदली पेक्षा निश्चितच आपली नोकरी (सेवा)अधिक महत्वाची आहे.आज ना उद्या हळूहळू का होईना आपली बदली होईल परंतु चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल करून बदली करण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना विनंती.

➡ राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.

                               लिंक
                        goo.gl/j9nFGk

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे

Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

Disclaimer : -सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

1 comment:

  1. बदल्या कधी होणार आहेत

    ReplyDelete

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results