Monday, June 19, 2017

Saral update

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०५०*
*दिनांक* : *१८/०६/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे दोन दिवस student portal बंद ठेवले जाणार असण्याबाबतची सूचना* __________________________________________

✏ *सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की,काही तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 19/06/2017 सकाळी 9:00 पासून ते दिनांक 20/06/2017 सायं 6:00 पर्यंत student portal बंद ठेवण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.या कालावधीमध्ये कोणीही student पोर्टल मध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करू नये.*

✏ *सध्या student पोर्टल मध्ये इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ही सुविधा दिनांक 25/06/2017 पर्यंत उपलब्ध असणार आहे.*

✏ *इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे याविषयीचे Manual (माहितीपत्रक) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

                                *लिंक*

                 https://goo.gl/RSzyXY

✏ *तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी विद्यार्थ्याचे प्रमोशन करण्याची सुविधा दिनांक 21/06/2017 ला उपलब्ध करून दिली जाणार आहे.ही सुविधा दिनांक 30/06/2017 पर्यंत दिली जाणार आहे.सदर मुदतीमध्ये त्या त्या वर्गांचे विद्यार्थी प्रमोशन करून घ्यावयाचे आहे.आपले प्रमोशन पूर्ण न झाल्यास सन 2017-18 च्या संच मान्यता साठी समस्या निर्माण झाल्यास आपणास अडचण येऊ शकेल हे लक्षात घ्यावे.*

✏ *प्रमोशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत student ट्रान्सफर सुविधा बंद करण्यात आलेली आहे याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.प्रमोशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर ही सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी मागील वर्षीच्या इयत्तेमधून उत्तीर्ण झाला असेल आणि आता तो दुसऱ्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी गेला असेल तर अशा विद्यार्थ्यास पुढील वर्गात प्रमोट करावे व जेंव्हा विद्यार्थी ट्रान्सफर सुविधा उपलब्ध होईल त्या वेळी ट्रान्सफर करावे.कोणत्याही परिस्थितीत सदर विद्यार्थ्याचे प्रमोशन करणे टाळू नये किंवा out of school करू नये.*

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*

                         goo.gl/j9nFGk

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत जर समजुतीचा घोटाळा झालेला असेल तर सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी._

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results