Tuesday, January 10, 2017

Daily attendance and selfie update

*दैनिक उपस्थिती व सेल्फी ॲप*
📲📲📲📲📲📲📲📲

_मागील दोन दिवसापासून शिक्षकांचे येत असलेले फोन व अडचणी लक्षात घेऊन  *शंकानिरसन* करण्यासाठी तयार केलेली पोस्ट_

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*① उपस्थिती ॲप डाउनलोड होत नाही ? काय करावे ???*

➢ खालील लिंकवर क्लिक करुन हे ॲप डायरेक्ट डाउनलोड करा. डाउनलोड सुरु होताना ```These kinds of app harmful for mobile, do you want to continue ?``` असा मेसेज येईल. त्याखाली असलेल्या *Yes* अॉप्शनला क्लिक करा, थोड्याच वेळात ॲप डाउनलोड होऊन स्क्रीनवर दिसेल.

⤵डायरेक्ट डाउनलोड लिंक

goo.gl/lcbhS5

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*② ॲप डाउनलोड झाले परंतु आता मोबाईल नं. मँप झाला नाही, असा इंग्रजीतून मेसेज येतोय ?*

➣ याचा अर्थ असा होतो, की आपला मोबाईल नं. आपल्या वर्गाला असाईन झाला नाही. त्यासाठी सरल वेबसाईटच्या Student portal ला भेट देऊन त्यातील  *Master* टँबमधील *assign teacher* या अॉप्शनला क्लिक करावे लागेल व तुम्ही वर्गशिक्षक असलेले सर्व वर्ग / तुकड्यांना तुमचे प्रोफाईल असाइन करावे लागेल.

Student Portal Link :

Student.maharashtra.gov.in

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*③या वर्षी माझी नविन शाळेवर बदली झाली आहे.मग मला काय करावे लागेल ?*                                                                                                                                      
➤  बदली करून गेलेले शिक्षक delete करणे व नवीन शिक्षक create करणे.
हे काम आपल्याला https://education.maharashtra.gov.in  या सरल च्या वेबसाईट वरील student portal मधील master या tab मध्ये जाऊन create teacher user (या ठिकाणी खाली शिक्षकांची यादी आहे यात फक्त जे बदलून दुसय्रा शाळेवर गेलेत त्यांना delete करून नवीन शिक्षक add करून घ्यावेत.) या मेनूत  प्रत्येक शिक्षकाचे नाव, शालार्थ id, पद, कार्यालय, इ-मेल आयडी, mobile क्रमांक add करून Resister बटनावर  क्लिक करावे.

या सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती :

goo.gl/cnOeMA

*④ माझ्याकडे Android फोन नाही ? पर्याय सांगा ?*

➽  सर्वात चांगला पर्याय की तुम्ही नविन स्मार्टफोन खरेदी कराच. कारण यात तुम्ही एकदा रजिस्टर्ड केलेला मोबाईल बदलायचा असल्यास परत एकदा Student portal ला जावून माहितीमध्ये बदल करावा लागेल. त्यामुळे दोन - तीन दिवस थांबून डायरेक्ट आपल्याच मोबाईलवरुन माहिती भरलेली चांगली, कारण मागील दिवसाची उपस्थिती भरण्याची सोय आहे.
तरीही आपणास पूढील दोन पर्याय उपलब्ध आहेत -
1. दुसऱ्याच्या मोबाईलवरुन माहिती भरा, परंतु तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा व विश्वासू हवा. तसेच दर सोमवारी विद्यार्थ्यांच्या सेल्फीसह उपस्थिती असल्याने तुम्हाला मोबाईल शाळेत आणावाच लागेल.
2. सहकारी शिक्षकांच्याच मोबाईलमध्ये Dual app घेऊन दोन Attendence App चालवता येतील.

Dual app download link :

https://goo.gl/Enj1EO

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*⑤ शाळेत रेंज नाही ? ॲप चालेल का ?*

➠ शाळेत रेंज नसल्यास हे ॲप चालणार नाही, कारण हे आॉनलाइन ॲप आहे. मात्र शाळेनंतर दुसरीकडे जिथे रेंज असेल तेथून व तेंव्हा माहिती भरता येईल. परंतु दर सोमवारी सेल्फी उपस्थिती भरणे, सध्या तरी कठीण आहे.

कोणकोणत्या सिमकार्डला रेंज आहे ? कसे ओळखावे ?

goo.gl/UAgMTE

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*⑥ रेंज नसल्याने मोबाईल नंबर बदलला तर काय करावे लागेल ?*

➧ त्यासाठी परत एकदा Student portal वरुन मोबाईल नं. चेंज करुन घ्यावा लागेल .

तंत्रज्ञान विश्वातील विविध माहिती व ट्रीक्स (युक्त्या) :

goo.gl/8cQOyJ

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*⑦ ॲपवरुन उपस्थिती नेमकी कशी भरावी ?*

☞ सर्व प्रक्रिया संपल्यानंतर ॲपमध्ये खालीलप्रमाणे चार विंडो येतील.
1. => View Attendence Report (भरलेली दैनिक उपस्थिती पाहता येईल.)
2. =>  Submit attendence Report  ( दैनिक उपस्थिती भरता येईल)
3. => View Selfie attendance report (सेल्फी उपस्थिती पाहता येईल. )
4. => Submit attendance with selfie (सेल्फीने उपस्थिती भरता येईल.)

वरीलप्रमाणे 2 नंबरच्या अॉप्शनला क्लिक करुन दिनांक निवडा. आता विद्यार्थी यादी येईल. यातील *अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावासमोर* टिक करा.
नंतर submit attendance बटण दाबा. स्क्रीनवर उपस्थित व अनुपस्थित विद्यार्थी संख्या येईल. खात्री करुन ok करा. झाली उपस्थिती भरुन. जर तुमच्याकडे दोन / तीन वर्ग / तुकड्या असतील तर Do you want to continue या खालील Yes अॉप्शन निवडून नविन वर्ग / तुकडी select करा व वरील प्रमाणे परत माहिती भरा.

Daily Attendence app video by balaji jadhav

goo.gl/4W42c5

⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇⊆⊇

*⑧ सेल्फी उपस्थिती काय आहे ? कशी व कधी भरायची ?*

☛ दर सोमवारी सेल्फी उपस्थिती भरायची आहे. वरील माहितीप्रमाणे 4 (चौथा) क्रमांक पर्याय निवडून ही उपस्थिती भरता येते. त्यासाठी वर्ग व दिनांक निवडून Take selfie अॉप्शनला क्लिक करा, कँमेऱ्यामध्ये एकावेळी जास्तीत जास्त 10 विद्यार्थी घ्या. सेल्फी काढून वरती असलेल्या ok वर  करा. आलेल्या विद्यार्थी यादीतून *त्या सेल्फीमध्ये असलेल्या* विद्यार्थ्यांना क्लिक करुन सेल्फी सबमिट करा, सर्व विद्यार्थी सेल्फीमध्ये येईपर्यंत ही कृती करुन शेवटी सर्व सेल्फी सबमिट करुन सेल्फी उपस्थिती Done करा. नोंदवलेली सेल्फी उपस्थिती 3 (तिसऱ्या) क्रमांकावरुन पाहता येईल.

या सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती देणारे श्री. प्रदीप भोसले सरांचे User Manual डायरेक्ट डाउनलोड करा :

goo.gl/aS568z

⊆⊇🙏🏻 *धन्यवाद* 🙏🏻 ⊆⊇
सर्व माहिती व लिंक उपयुक्त असल्याने त्यात बदल न करता पूढे पाठवावे.

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results