Saturday, December 31, 2016

MDM Special Post

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *1007*
*दिनांक* : *31/12/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

__________________________________________
*शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल मध्ये 30 नोव्हेंबर 2016 रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल (Closing Balance) नोंद करण्याबाबत सूचना आणि माहिती भरताना येणाऱ्या शंकांचे समाधान बाबत* __________________________________________
प्रत्येक जिल्ह्याचे पोषण आहार धान्य व धान्यादी माल वाटप प्रमाण वेगवेगळे असल्याने परंतु MDM पोर्टलला संपूर्ण राज्यासाठी एकच प्रमाण घेतले गेले असल्याने शाळेत असलेल्या प्रत्यक्ष शिल्लक साठा आणि MDM पोर्टलमध्ये  सिस्टिम कडून जनरेट झालेला शिल्लक साठा यात तफावत असल्याचे दिसून येते.ही तफावत दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दिनांक 30 नोव्हेंबर 2016 चा शाळेत असलेला (नोंद वहीप्रमाणे) प्रत्यक्ष शिल्लक साठा (Closing Balance) हा MDM पोर्टलमधील शिल्लक साठ्यासोबत जुळवून नोंद करावयाचा आहे.यासाठी शाळेतील शिल्लक साठा हा अंतिम समजून त्याप्रमाणे MDM पोर्टल मधील शिल्लक साठ्यामध्ये योग्य तो बदल करावयाचा आहे.तशी सुविधा MDM लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात येत आहे.
                           
                             🚸 *सूचना* 🚸

    *सर्व शाळांनी दिनांक 22/12/2016 ते 31/12/2016 या मुदतीमध्ये आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे.* हे करत असताना आपल्याकडून या वेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काटेकोरपणे मुख्याध्यापकाने काळजी घ्यायची आहे.चुकलेल्या माहितीमुळे भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास संबंधितास जबाबदार धरण्यात येणार आहे.
  *ही माहिती MDM पोर्टल मध्ये कशी भरायची याबाबत चे मॅन्युअल आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे वाचण्यासाठी/Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

*मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठीची लिंक :*

https://goo.gl/vQwXoq
__________________________________________
🔹 *30 नोव्हेंबर चा क्लोजिंग बॅलन्स भरताना पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे* 🔹 __________________________________________

1) *क्लोजिंग बॅलन्स माहिती भरताना जर चुकीची माहिती भरली गेली आणि ती माहिती approve झाली तर ती माहिती पुन्हा भरता येईल का?*

*उत्तर* : *नाही.* सध्या तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.भविष्यात तशी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

2) *क्लोजिंग बॅलन्स माहिती भरत असताना काहीच माहिती न भरता चुकून सदर माहिती approve झाली,परंतु आता ही माहिती पुन्हा भरता येत नाही.ही माहिती पुन्हा भरण्यासाठी काय करावे ?*

*उत्तर* : एकदा क्लोजिंग बॅलन्स approve झाला की पुन्हा भरता येत नाही.त्यामुळे काळजीपूर्वक माहिती भरावी.

3) *नोंद वहीत असलेला क्लोजिंग बॅलन्स आणि mdm पोर्टलला असलेला क्लोजिंग बॅलन्स जुळत नाही, याचा अर्थ काय समजावा?*

*उत्तर* : mdm पोर्टलला सध्या संपूर्ण राज्यासाठी धान्य व धान्यादी माल वापरण्याचे एकच प्रमाण गृहीत धरून क्लोजिंग बॅलन्सचा हिशोब दाखवण्यात आलेला आहे.प्रत्यक्षात मात्र प्रत्येक जिल्ह्याचे धान्य व धान्यादी माल वापरण्याचें प्रमान वेगवेगळे आहे.सध्या हे वेगवेगळे प्रमाण सिस्टिम ला घेण्यात न आल्याने आपल्या नोंद वहीमधील क्लोजिंग बॅलन्स आणि mdm पोर्टल मधील क्लोजिंग बॅलन्स हा जुळत नसल्याचे दिसून येते.अशा वेळी आपण गोंधळुन न जाता आपल्या नोंदवहीमधील 30 नोव्हेम्बरचा क्लोजिंग बॅलन्स mdm पोर्टल ला वर सांगितल्याप्रमाणे भरून घ्यावा.चालू प्रत्यक्ष बॅलन्स आणि mdm पोर्टल मधील बॅलन्स सध्या जुळत नसल्याची काळजी करू नये.

4)  *30 नोव्हेंबर 2016 चा क्लोजिंग बॅलन्स भरल्यानंतर स्टॉक बॅलन्स रिपोर्ट मध्ये MDM पोर्टल मधील चालू (current) बॅलन्स हा नोंद वही मधील बॅलन्स(प्रत्यक्ष शिल्लक साठा) सोबत जुळलेला दिसत नाही,याचा अर्थ काय?*

*उत्तर* : आपण सध्या फक्त 30 नोव्हेंबर चा क्लोजिंग बॅलन्स भरत आहोत.स्टॉक बॅलन्स रिपोर्ट मध्ये आपण भरलेला नोव्हेंबर चा क्लोजिंग बॅलन्स नोव्हेंबर महिन्याला क्लीक करून पाहू शकतो.आपण जो बॅलन्स भरलेला आहे तोच बॅलन्स तेथे दिसून येईल.परंतु चालू तारखेचा क्लोजिंग बॅलन्स मात्र जुळत नसलेला दिसेल.याबाबत अधिक गोंधळून जाऊ नये.आपल्या जिल्ह्याचे धान्य व धान्यादी माल वापरण्याचे प्रमाण अद्याप सिस्टिम ला update केलेले नसल्याने चालू तारखेचा क्लोजिंग बॅलन्स हा आपल्या प्रत्यक्ष धान्य साठ्याशी जुळत नसलेला दिसेल.धान्य व धान्यादी मालाचे वापरावयाचे जिल्हानिहाय प्रमाण सिस्टिम ला लवकरच update करण्यात येणार आहे.त्यानंतर आपली नोंदवही आणि mdm पोर्टल यामधील क्लोजिंग बॅलन्स हा चालू तारखेशी जुळलेला दिसून येईल.

5) *30 नोव्हेंबर चा क्लोजिंग बॅलन्स का भरावयाचा आहे? याचा फायदा काय? सिस्टिम मध्ये जिल्हानिहाय धान्य व धान्यादी माल वापरण्याचे प्रमाण update केले असते तर आपोआप क्लोजिंग बॅलन्स जनरेट झाला नसता का?तसे झाले असते तर ही माहिती भरण्याची गरज पडली नसती,असे वाटते? यावर सविस्तर माहिती द्या.*

*उत्तर* : मित्रांनो,या शैक्षणिक वर्षांपासून शालेय पोषण आहार पोर्टल म्हणजेच MDM पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.हे पोर्टल सुरु झाले तेंव्हा सुरुवातीला सर्व शाळांना त्यामध्ये आपल्या शाळेत असलेला मागील शैक्षणिक वर्षांचा म्हणजेच दिनांक 1 जून 2016 चा शिल्लक धान्य व धान्यादी माल (शिल्लक साठा) म्हणजेच opening balance नोंद करण्याची सूचना दिली गेली होती.सर्व शाळांनी या opening balance ची नोंद देखील केलेली आहे.परंतु त्या वेळी काही शाळांची माहिती भरताना चूक देखील झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
    तसेच सर्व शाळा दररोज शालेय पोषण आहार लाभार्थी दैनंदिन माहिती म्हणजेच daily attendance भरत आहेत.हे भरत असताना काही शाळाकडून मागील काही दिवसांची माहिती भरावयाची राहून गेलेली आहे किंवा माहिती भरली परंतु चुकलेली आहे.यामुळे नोंद वही मधील शिल्लक धान्य साठा हा mdm पोर्टल मधील शिल्लक साठ्या सोबत जुळत नाही.
    अशा चुकांमुळे त्या शाळेच्या आपल्या पोषण आहार नोंद वही मध्ये असलेला सध्याचा शिल्लक साठा आणि MDM पोर्टल ला system कडून तयार ऑटो जनरेट झालेला शिल्लक साठा यामध्ये ताळमेळ बसत नाही म्हणजेच तफावत आढळून येत आहे असे लक्षात आले आहे.त्यामुळे आपल्याकडे नेमके किती धान्य शिल्लक आहे हे समजणे कठीण होत आहे.ही समस्या दूर करण्यासाठी सर्व शाळांनी आपल्या शाळांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी असलेला प्रत्यक्ष शिल्लक साठा (नोंद वहीमध्ये नोंद असलेला धान्य व धान्यादी माल) आपल्या शाळेच्या MDM पोर्टल ला नव्याने नोंद करावयाचा आहे.
   जरी सिस्टिम ला जिल्हानिहाय प्रमाण update करून सध्याचा क्लोजिंग बॅलन्स दाखवला तरी तो प्रत्यक्ष क्लोजिंग बॅलन्स सोबत जुळला नसता कारण शाळा स्तरावर 1 जुन चा opening balance आणि daily attendance माहिती अचूक भरली गेलेली नाही.परंतु आता 30 नोव्हेंबर चा क्लोजिंग बॅलन्स भरल्यावर मात्र या आधी भरलेली opening balance आणि daily attendance ची माहिती जरी चुकलेली असेल तरी देखील चालू क्लोजिंग बॅलन्स वर त्याचा परिणाम पडलेला दिसून येणार नाही.

6) *क्लोजिंग बॅलन्स भल्यानंतर या आकडेवारीचा शाळांना याचा काय फायदा होणार?*

*उत्तर* : आपल्या शाळेत किती धान्यसाठा उपलब्ध आहे हे वरिष्ठ स्तरावर दिसून येईल त्यामुळे शाळेला धान्याची जी मागणी करावी लागते ती आता करावयाची गरज पडणार नाही,ही मागणी वरिष्ठ स्तरावरून पूरवठादाराकडे परस्पर पाठवली जाईल.

7) *क्लोजिंग बॅलन्स नोंद करताना असे लक्षात आले की,30 नोव्हेंबर ला माझ्या शाळेत धान्य शिल्लक नव्हते परंतु मी हे धान्य इतर शाळेतून उसने घेतलेले आहे,अशा वेळी क्लोजिंग बॅलन्स माहिती भरताना मी कशी नोंद करावी?*

*उत्तर* : या केस मध्ये जरी आपण धान्य उसने घेतले असेल तरी सुद्धा त्या धान्य उसना धान्यसाठ्याला गृहीत धरूनच आपण नोंद घ्यायची आहे.काही शिक्षक बांधव उसने घेतलेले धान्य हे क्लोजिंग बॅलन्स मध्ये मायनस दाखवावे का असे विचारतात.मित्रांनो,हे उसने घेतलेले धान्य मायनस दाखवू नये.जरी इतर शाळेकडून आपण धान्य उसने घेतले असेल तर हे धान्य त्या शाळेला परत करावयाची गरज नसते हे या आधीच स्पष्ट करण्यात आलेले आहे.इतर शाळेकडून धान्य उसने घेतले असेल तर ते परत न करता फक्त तशी नोंद ही नोंदवहीत आणि mdm पोर्टल ला घ्यावे व वरिष्टाणा कळवावी.इतर शाळेत देखील धान्य साहित्य उपलब्ध नसेल तर अशा वेळी शाळा खुल्या बाजारातून धान्य विकत घेऊ शकते आणि सदर धान्याचे बील पंचायत समिती कडे सादर करून बील प्राप्त करून घेता येते.

8) *क्लोजिंग बॅलन्स माहिती भरण्याची अंतिम मुदत बाबत माहिती सांगा?*

*उत्तर* : क्लोजिंग बॅलन्स माहीती भरण्याची अंतीम मुदत ही 31 डिसेंबर 2016 ही आहे.यानंतर मुदतवाढ मिळणार नाही असे वरिष्ठ स्तरावरून या आधीच सांगण्यात आलेले आहे.

    अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

धन्यवाद
Pradip bhosle

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results