Tuesday, October 25, 2016

SARAL NEW UPDATE

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *25/10/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)*

                *संच मान्यता पोर्टल विशेष*

1) संच मान्यता पोर्टल अद्याप सुरु आहे हे लक्षात घ्यावे.या मध्ये अपूर्ण माहिती आज भरून पूर्ण करावी.सदर माहिती क्लस्टर ने त्वरित finalized  करावी. *क्लस्टर ने finalized केलेल्या शाळांचीच संच मान्यता केली जाणार आहे हे लक्षात घ्यावे* त्यामुळे शाळा स्तरावरील finalized माहिती क्लस्टर ने तपासून त्वरित finalized करावी.शाळा अथवा क्लस्टर चे दुर्लक्ष झाल्याने जर माहिती वेळेत finalized झाली नाही तर यासाठी संबंधितांना जबाबदार धरले जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.

2) आज सर्व शाळांनी student पोर्टल मध्ये भरलेली माहिती जी संच मान्यता साठी गृहीत धरले जाणार आहे ती विद्यार्थी माहिती संच मान्यता पोर्टल student details या page मध्ये दाखवली जाणार आहे.सदर माहिती आपण फक्त पाहू शकाल,या माहितीमध्ये आपण बदल करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.तसेच *ही स्क्रीन आपणास finalized देखील करावयची नाही.* यानंतर लगेचच शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये संच मान्यता उपलब्ध करून दिली जाणार आहे हे लक्षात घ्यावे.

3) *संच मान्यता पोर्टल मध्ये शाळांनी finalized केलेली माहिती क्लस्टर ने finalized करावयाची आहे* .एवढेच काम सध्या संच मान्यता पोर्टल मध्ये क्लस्टर ने करायचे आहे.परंतु काही क्लस्टर ने शाळा माहिती finalized केल्यानंतर शाळांच्या नावासमोर असलेल्या approve या टॅब वर क्लीक करून सदर शाळा संच मान्यता approve केली होती अशा शाळांना संच मान्यता माहिती चुकलेली असेल तर शाळेस return करता येत नव्हते.परंतु अशा शाळांना आता रिटर्न करता येऊ शकेल.ही सुविधा काल पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.म्हणजेच *ज्या शाळांची माहिती क्लस्टर ला रिटर्न करता येत नव्हती ती माहिती आता क्लस्टर रिटर्न करू शकेल* .जर शाळांची माहिती चुकलेली असेल तरच क्लस्टर ने रिटर्न करावी,अन्यथा finalized करून ठेवावी.

4) संच मान्यता पोर्टल सुरु होण्याअगोदर स्कूल पोर्टल सुरु होते.त्यामध्ये शाळांनी भरलेली माहिती संच मान्यता पोर्टलला घेण्यात आलेली आहे.*स्कूल पोर्टलमध्ये जी माहिती आपण भरलेली होती तीच माहिती संच मान्यता पोर्टल ला दिसून येते* .म्हणजेच जर स्कूल पोर्टलमध्ये जर आपण ही माहिती finalized केलेली असेल तर संच मान्यता पोर्टल मध्ये देखील ही माहिती finalized झालेली दिसून येईल.परंतु आता आपणास ही माहिती जर चुकलेली आहे आणि त्यात बदल करावयाचा आहे असे वाटत असेल तर सदर माहिती संच मान्यता क्लस्टर लेवल मधून रिटर्न करून घ्यावी.त्यानंतर आपणास ही माहिती भरता अथवा दूरस्थ करता येईल.
बर्याच शाळांची अशी तक्रार होती की संच मान्यता मध्ये आम्हाला माहिती भरता येत नाही आहे त्यांनी या सूचनेनुसार अंमलबजावणी करावी.

*महत्वाची सूचना* : संच मान्यताच्या बेसिक माहितीमध्ये फक्त वरखोल्या आणि  माध्यम भरायची सुविधा देण्यात आलेली आहे.इतर माहिती मध्ये बदल करावयाचा असेल तर कृपया शिक्षनाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

5) काही शाळांना संच मान्यता मध्ये teaching आणि non teaching details भरता येत नाही किंवा ती माहिती भरण्याची सुविधा दिसून येत नाही अशा शाळांना सूचित करण्यात येत आहे की *मागील वर्षी आपली संच मान्यता झालेली नसल्याने आपणास ही सुविधा देण्यात आलेली नाही* आहे याची नोंद घ्यावी.

6)मागील वर्षी संच मान्यता माहिती *शाळा लेवल ला भरून पूर्ण केली असेल* आणि *क्लस्टर किंवा शिक्षणाधिकारी लेवल ला जर ती approve नसेल* तर सदर संच मान्यता ही आपण *शिक्षणाधिकारी* कार्यालयाशी संपर्क साधून approve करून घेऊ शकाल आणि त्यानंतर आपणास या वर्षीच्या संच मान्यता पोर्टल मध्ये माहिती भरता येऊ शकेल. *परंतु जर मागील वर्षी आपण माहिती उपलब्ध नसणे वा इतर कारणास्त्व संच मान्यता पूर्ण केली नसेल तर सदर माहितीची पूर्तता करून मागील संच मान्यता जेंव्हा पूर्ण होईल तेंव्हाच आपणास या वर्षी संच मान्यता पोर्टल मध्ये माहिती भरता येईल याची नोंद घ्यावी.* तोपर्यंत आपण माहुती भरू शकणार नाही.परंतु *मागील वर्षीची संच मान्यता भरण्यासाठीची सुविधा सध्या बंद करण्यात आलेली आहे,* सदर सुविधा सुरु करण्याबाबत योग्य वेळी वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना देण्यात येतील हे लक्षात घ्यावे.

7) जर *मागील वर्षी आपली संच झालेली असेल* आणि तरी देखील सदर माहिती आपणास भरता येत नसेल किंवा दूरस्थ करता येत नसेल तर  या वर्षी *स्कूल पोर्टल मध्ये ही माहिती finalized केलेली होती का याचा विचार करावा* आणि तसे असेल तर संच मान्यता क्लस्टर लेवल मधून सदर स्क्रीन रिटर्न करून घ्यावी.यानंतर आपण सदर माहितीमध्ये बदल करू शकाल.

8) जर *मागील वर्षी संच मान्यता झालेली असेल* तसेच *क्लस्टर लेवल मधून रिटर्न करूनही आपण टीचिंग आणि नॉन टीचिंग डिटेल्स भरू  शकत नसाल* तर आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपली समस्या online नोदवण्यासाठी एक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.कृपया तेथे आपली समस्या सविस्तर नोंदवा.आपली समस्या योग्य असेल तर त्वरित दूर करण्यात येईल.
संच मान्यता पोर्टल संदर्भात आपली समस्या पुढील लिंक ला क्लीक करून देखील आपण नोंदवू शकाल हे लक्षात घ्यावे.

*लिंक* :  https://goo.gl/fbP84Q

9) काही शाळांना संच मान्यता मध्ये टीचिंग डिटेल आणि नॉन टीचिंग डिटेल भरताना आपल्या व्यवस्थापनामध्ये माहिती भरण्यासाठी option उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.अशा शाळांना सूचित करण्यात येत आहे की, मागील वर्षी आपली संच मान्यता ही *ज्या व्यवस्थापनात* झालेली आहे *त्याच व्यवस्थापनात* या वर्षी संच मान्यता पोर्टल मध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग माहिती भरता येऊ शकेल.जर मागील वर्षी आपले व्यवस्थापन चुकलेले असेल तर ते दूरस्थ करावे लागेल.परंतु सध्या *व्यवस्थापन दूरस्थ करण्यासाठीची सुविधा देण्यात आलेली नाही आहे* परंतु लवकरच ही सुविधा *शिक्षणाधिकारी* लॉगिन ला देण्यात येणार आहे,तशी सूचना आपणास योग्य वेळी देण्यात येईल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Blog: havelieducation.blogspot.in
https://javedmaqsood.blogspot.In

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results