Monday, September 19, 2016

Saral Date extended till 26 September 2016

*सरल महत्वाचे*  :
*दिनांक* : १९/०९/२०१६
( *अत्यंत महत्वाचे असल्याने सर्व बांधवाना शेअर करावे* )

१)अद्याप बऱ्याच शाळांनी आपले student व school पोर्टलमध्ये माहिती भरलेली नाही असे दिसून येत आहे.तरी या शाळांनी केलेल्या विनंती वरून आणि राहिलेले काम पाहता अशा शाळांसाठी खालीलप्रमाणे काही दिवस मुदत वाढवून देण्यात येत आहे अशी सुचना या post द्वारे *मा.डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स, महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक, बालभारती,पुणे* यांच्याकडून देण्यात येत आहे,याची नोंद घ्यावी.

✅ *शाळा साठीच्या अंतिम मुदत पुढीलप्रमाणे* :

*student पोर्टल ची सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत : आजपासून ते २६/०९/२०१६*

*school पोर्टल ची सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत : आजपासून ते २६/०९/२०१६*

✅ *cluster (केंद्रप्रमुख) लेवल साठी अंतिम मुदत*  :

*student पोर्टल ची सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत : आजपासून ते २८/०९/२०१६*

*school पोर्टल ची सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत : आजपासून ते २८/०९/२०१६*

✅ *B.E.O (गटशिक्षणाधिकारी)* :

*school पोर्टल ची सर्व काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत : आजपासून ते ३०/०९/२०१६*

*महत्वाचे* : अंतिम मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवून दिली जाणार नाही.

2)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता *३०/०९/२०१६* या तारखेला शाळेच्या *student व school पोर्टल* मध्ये असलेल्या माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे अशा स्पष्ट सुचना या post द्वारे *मा.डॉ.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा शिक्षण संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून देण्यात येत आहे.

३) *अत्यंत महत्वाचे* : student पोर्टल मध्ये शाळांनी भरलेली student ट्रान्स्फर, प्रमोशन, duplication आणि इतर *सर्व माहिती cluster (केंद्रप्रमुख) द्वारे verify (पडताळणी) केली जाणार आहे* ,असा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.
शाळांनी student ट्रान्स्फर, प्रमोशन, new entry इत्यादी सर्व कामे पूर्ण केल्यावर शाळा लेवल ला HM report च्या कॅटलॉग मध्ये ते विद्यार्थी update होत असतात. म्हणजेच सदर कॅटलॉग मधील विद्यार्थी हे त्या शाळेचे अंतिम विद्यार्थी आहेत असे गृहीत धरले जाते.म्हणून शाळेच्या या कॅटलॉग चा एक report हा cluster login ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.cluster head या report च्या आधारे प्रत्येक शाळेत *प्रत्यक्ष जाऊन* त्या *कॅटलॉग नुसार* विद्यार्थी आहे किंवा नाही हे तपासून verify करणार आहे याची नोंद घ्यावी.cluster ने तपासणी केल्यावर प्रत्येक विद्यार्थी cluster द्वारे verify केला जाणार आहे,तशी सुविधा cluster login ला देण्यात येणार आहे. *cluster ने verify केलेला विद्यार्थीच संचमान्यतेसाठी घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी* .जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहे किंवा परराज्यात शिकण्यास गेलेले आहे,इतर शाळेत शिकण्यास गेलेले आहे परंतु आपल्या login मध्ये अद्याप पर्यंत दिसून येत आहे,विद्यार्थी मयत आहे अशा विध्यार्थ्यांना त्या शाळेतून *out of school*  करण्याची सुविधा cluster लेवल ला दिली जाणार आहे.cluster अशा मुलांना out of school करताना सदर कारणांचा उल्लेख करतील.अशा out of school मुलांची लिस्ट शाळा,गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी लेवल ला दाखवली जाणार आहे याची नोंद घ्यावी.out of school करणे म्हणजे विद्यार्थी delete करणे असा अर्थ घेऊ नये.out ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी संचमान्यतासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.शाळेच्या online कॅटलॉग नुसार शाळेच्या प्रत्यक्ष पटाची तपासणी केंद्रप्रमुखाने जबाबदारीने आणि गांभीर्याने करावयाची आहे याची नोंद सर्व केंद्रप्रमुखाने घ्यावी.कारण सदर माहिती ही संच मान्यतेसाठी महत्वाचे असणार आहे,म्हणून सदर माहिती अचूक असेल याची जबाबदारी केंद्र्प्रमुखाची असेल.
*केंद्रप्रमुखाने शाळेचा कॅटलॉग verify केल्यावर सदर शाळेची student पोर्टल ला उपलब्ध असणारया student ट्रान्स्फर,प्रमोशन,new entry अशा सर्व सुविधा बंद करण्यात येईल याची नोंद सर्व शाळेने घ्यावी* .त्यामुळे या पोस्ट द्वारे सर्वांना सुचना देण्यात येत आहे की आपले सर्व काम दिलेल्या वेळेत आणि अचूक करून घ्यावे.वर उल्लेख केलेल्या तारखा या अंतिम आहे याची नोंद घ्यावी.आपल्या अपूर्ण कामामुळे आपल्या संचमान्यतेसारख्या महत्वाच्या कामावर याचा परिणाम झाल्यास यासाठी संबंधित जबाबदार राहील.

४)student ट्रान्स्फर करणे या सरल online प्रक्रियेमध्ये  विद्यार्थ्यांची नविन शाळा जुन्या शाळेला माहिती ट्रान्स्फर करण्यासाठी online request पाठवते,जुन्या शाळेने सदर online request ही approve करून त्या विद्यार्थ्याची माहिती ही नविन शाळेला online ट्रान्स्फर करावयाची असते आणि ही माहिती नविन शाळेला जेंव्हा मिळते त्यावेळी नविन शाळा सदर विद्यार्थ्याला update करते.जेंव्हा विद्यार्थी नविन शाळेकडून update केला जातो तेंव्हा तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने ट्रान्स्फर झाला असे समजले जाते.आणि त्यानंतरच तो विद्यार्थी शाळेच्या online कॅटलॉग मध्ये दिसून येतो.या प्रक्रियेमध्ये असे दिसून येत आहे की,बऱ्याच शाळा आपल्या शाळेतून शिकण्यास गेलेल्या मुलांच्या ट्रान्स्फरसाठी  आलेल्या request या approve करत नाही आहे,काही शाळा विद्यार्थी approve होऊन आल्यावर update करत नाही आहे तसेच काही शाळा विद्यार्थी ट्रान्स्फर च्या request न पाठवता new entry करून घेऊ अशा समजुतीत आहे.अशा *सर्व शाळाना सूचित करण्यात येत आहे की आपल्याला आलेल्या request आपण approve केल्या नाही तर त्या त्वरीत approve करून घ्याव्यात.आपल्या अपूर्ण कामामुळे दुसऱ्या शाळेच्या संचमान्यतेवर परिणाम होऊ शकतो.आपले अपूर्ण काम असणाऱ्या शाळांची नावे  आता गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, deputy director login ला उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापुढे request approve न करणाऱ्या शाळांना अशा समस्यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी* .तसेच approve होऊन येणारे विद्यार्थी अंतिम मुदतीच्या आत आपण update करून घ्यावे अन्यथा असे विद्यार्थी आपणास कॅटलॉग मध्ये दिसून येणार नाही याची नोंद घ्यावी.  

५)विद्यार्थी ट्रान्स्फर request पाठवल्यावर जर जुन्या शाळेने ती request approve केली नाही तर अशा ही request approve/reject करण्यासाठी मुख्याध्यापकाच्या म्हणजेच जुन्या शाळेच्या login सोबत *गटशिक्षणाधिकारी* यांच्या login ला देखील उपलब्ध होते.परंतु गटशिक्षणाधिकारी login मधून देखील पेंडिंग काम खूप मोठ्या प्रमाणात आसे असे दिसून येत आहे.अशा पेंडिंग काम असणाऱ्या *गटशिक्षणाधिकारी यांना या post द्वारे सूचित करण्यात येत आहे की आपल्या login ला आलेल्या request बाबत संबंधित शाळेशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करणे ही आपली देखील जबाबदारी आहे,याची नोंद घ्यावी.आपल्या पेंडिंग कामाची लिस्ट वरिष्ठ लेवल ला उपलब्ध करून देण्यात येत आहे ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यावी* .आपल्या पेंडिंग कामाबाबत योग्य ते नियोजन करून आपल्या ब्लॉक चे काम  अंतिम मुदतीत १००% पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्यावे.

अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

✅student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा. लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्य्स्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

✅राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी लिंक :   https://goo.gl/6CiLy0

६) *नविन विद्यार्थी बाबत महत्वाचे* :
 इयत्ता पहिलीच्या मुलांची नोंद घेण्यासाठी offline पद्धतीने माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ही माहिती अपलोड करताना अपलोड न होण्याच्या अडचणी काही शाळांना निर्माण होत आहे.यासाठी काही मार्गदर्शक सुचना दिल्या जात आहे त्या वाचाव्यात.

offline माहिती भरत असताना excel sheet मध्ये *जास्तीत जास्त ५० विद्यार्थी* भरावे,त्यापेक्षा अधिक मुले नोंद करावयाची असेल तर अशा मुलासाठी नविन sheet चा वापर करावा म्हणजे अपलोड करताना data server वर ताण पडत नाही आणि प्रक्रिया लवकर पूर्ण होते.

माहिती भरून झाल्यावर excel sheet चे रुपांतर .csv मध्ये केल्यानंतर तयार होणाऱ्या csv file ला open न करता अपलोड करावे.

excel sheet मध्ये माहितीमध्ये अंक आणि अक्षरे भरताना फक्त आणि फक्त इंग्लिश भाषेचाच वापर करावा.

काही शाळांना .csv file अपलोड केल्यावर बऱ्याच शाळांना create new division अशा अर्थाचा error येत आहे.आपण मागील वर्षी तुकडी तयार केलेल्या गोंधळामुळे ही समस्या आपणास येत आहे.परंतु ही समस्या दूर करण्यासाठी जेंव्हा आपण पहिली ची माहिती भरण्यासाठी excel sheet डाउनलोड करतो तेंव्हा त्यासोबत एक word format असलेली इज read me file देखील डाउनलोड होते ती आपण वाचावी.या file मध्ये शेवटच्या भागात आपल्या इयत्ता पहिली ची माहिती भरताना आपण कोणते माध्यम,stream,तसेच तुकडी क्रमांक भरावा याबाबत मार्गदर्शन केले आहे.ते वाचून त्याप्रमाणे आपण माहिती भरल्यास आपणास अशा समस्या येणार नाही.तसेच याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉगला भेट द्या.तेथे आपल्या सर्व प्रॉब्लेम वर आपणास उत्तरे मिळतील.तसेच तेथे असणारे manual वाचून आपण सविस्तर प्रोसेस जाणून घ्या.

file अपलोड होण्यास काही सेकंड ते काही मिनिट देखील लागतात.अशा वेळी आपण संयम पाळून वाट पहावी.कधी कधी step १ ही पूर्ण होते परंतु step २ मध्ये काही समस्या निर्माण होते अशा वेळी आपली file बऱ्याचदा अपलोड देखील झालेली असते.आपली file अपलोड झालेली आहे किंवा नाही ही आपण hm report मध्ये जाऊन कॅटलॉगमध्ये चेक करून घ्यावे.जर त्यात विद्यार्थ्यांची नावे दिसत नसतील तर पुन्हा file अपलोड करावी.तसेच file अपलोड करताना ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका दाखवल्या जातात.त्या दूर करून पुन्हा आपण ती file अपलोड करावी.अशा प्रकारे चुका दुरुस्थ केलेले विद्यार्थी माहिती save होते.


7) *आधार माहिती भरण्यासाठी महत्वाचे* :
 आधार माहिती कशी भरावी याबाबत manual उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.परंतु तरीही काही महत्वाच्या सुचना लक्षात घ्याव्यात.

आधार माहिती भरताना सध्या ज्या विद्यार्थ्यांकडे आधार नंबर उपलब्ध आहे त्यांची माहिती प्राधान्याने भरून घ्यावी.ज्या मुलांचे अद्याप आधार नंबर मिळालेले नाही अथवा त्यांनी काढलेले नाही अशा मुलांचे व पालकांचे प्रबोधन करून त्यांना आधार नंबर मिळवायला लावणे महत्वाचे आहे.

ज्यांची आधार नोंद झालेली आहे परंतु अद्याप आधार नंबर प्राप्त झालेला नाही आहे अशा मुलांच्या बाबतीत आधार नोंदणी क्रमांक (EID) टाकू नये.सदर माहिती REJECT करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ज्या मुलांची जन्मतारीख आधार कार्ड वर नसेल अथवा अपूर्ण असेल अशा मुलांची माहिती भरताना जन्मतारीख भरू नये ती excel शीट वर blank ठेवावी.

आधार कार्ड वर जे नाव असेल तेच नाव excel शीट वर भरावे.जरी नाव चुकले असेल तरी तेच नाव भरावे.त्यात दुरुस्थी करण्याचा प्रयत्न करू नये.

8) *प्रमोशन संबंधी महत्वाचे* :
इयत्ता १ ते 8 च्या काही मुलांचे ऑटो प्रमोशन करताना ते झालेले नाही आहे.या अडचणीचा विचार करून इयत्ता १ ते 8 या वर्गाला देखील इयत्ता 9 ते १२ वी प्रमाणे manual प्रमोशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,याची नोंद घ्यावी.ज्या मुलांचे ऑटो प्रमोशन झालेले नाही आहे अशा सर्व मुलांचे ऑटो प्रमोशन करून घ्यावे.काही शिक्षक अशा ऑटो प्रमोशन न झालेल्या मुलांचे standard updation करून त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेऊन जातात,तरी त्यांनी आता यापुढे असे न करता या मुलांना manual प्रमोट करावे.

student ट्रान्स्फर करताना विद्यार्थी चुकून मागील वर्गात ट्रान्स्फर झालेला असेल तर अशा मुलांना manual प्रमोशन या सुविधेचा वापर न करता standard updation या tab चा वापर करून इयत्ता मध्ये बदल करावा.

९) school पोर्टल मध्ये ज्या शाळांच्या वर्गाचे वर्ग वाढल्याने मागील वर्षी भरलेल्या category मध्ये आणि वरच्या वर्गात बदल झालेला असेल तर अशा शाळांनी आपली category बदल आपल्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.त्यांच्या लॉगीन ला सदर सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.

9) *MDM पोर्टल बाबत महत्वाचे* :
 ३१/०५८/२०१६ रोजी mdm माहिती app द्वारे भरण्यासाठी नवीन app उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.ते नवीन app सर्व शाळांनी use करावयाचे आहे अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.परंतु अद्यापही काही शाळा पूर्वीचेच app वापरत आहेत असे दिसून येत आहे.तरी दिनांक २६/०९/२०१६ नंतर जुन्या app द्वारे माहिती स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे सर्व शाळांनी नवीन update app हे site वरून डाउनलोड करून घ्यावे.

10) *इयत्ता 2 ते 12 पर्यंतच्या नवीन दाखल झालेल्या मुलांच्या बाबतीत महत्वाचे* :

सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली जाणार आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ 10 शाळेलाच ही परवानगी देऊ शकत होते परंतु आता अशी मर्यादा 30 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक 26 सप्टेंबर 2016* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.तसेच या सुविधेचा वापर करून काही शाळा इतर शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्याना ट्रान्सफर करून न घेता या सुविधेमधून add करत आहे अशा शाळेंना सूचना आहे की अशा पद्धतीने आपण जर विद्यार्थी add करून घेतले तर ते विद्यार्थी सिस्टिम द्वारे यथावकाश काढण्यात येतील.त्यामुळे भविष्यात जर आपले हे विद्यार्थी आपल्या कॅटलॉग ला दिसले नाही तर यासाठी केवळ संबंधितास जबाबदार धरले जाईल यावही गाम्भीर्याने नोंद घ्यावी

11) ✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 12) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results